संत सोपानकाका पालखीचा प्रवास खडतर

करंजे- संत सोपानकाका महाराज पालखीचे आगमन 12 जुलै रोजी निबुत व 13 जुलै रोजी सोमेश्वर कारखाना सोमेश्वरनगर येथे होत आहे. त्यावेळी निंबुत व सोमेश्वर कारखाना (सोमेश्वरनगर) या दोन्ही गावामध्ये पलखी मुक्काम असतो. पालखीचे आगमण तोंडावर असतानाही पालखी मार्गावरील अनेक कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
निरा बारामती महामार्ग असून सोपानकाका पालखी सोहळा याच मार्गावरून मार्गस्थ होउन निरेहून निंबुत, निंबुत छप्रि वाघळवाडी ते करंजेपुल असा आहे. या महामार्गच्यचा दोन्ही बाजूला साईड पट्या पूर्णपणे खचल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी रस्ता अरुंद व झाडे जुडपे वाढलेली दिसत आहेत. काही ठिकाणे खड्डे पडल्यामुळे ते अपघाताला आमंत्रण आहे. रस्त्यालगत असली झाडाझुडपे वाढल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला धोकादायक झाडे व त्यांच्या फांद्यामुळे केव्हाही अपघात होउ शकतो.
सोमेश्वरनगर मध्ये शिक्षण संकुल तयार झाले असून तेथे शिकत असलेल्या विद्यार्थी बरोबरच जेष्ठ नागरिकांची ही ये-जा प्रमाणात वाढ झाली असून खचलेल्या साईपट्याचा लोकांना त्रास होत आहे. स्त्यालागत असणारी झाडी-झोडपी काढण्याबरोरच साईडपट्या भराण्याची मागणी निबुत, वाघळवाडी व करंजेपुल येथील नागरिकांकडून होत आहे. रस्त्यालगत असणारे विद्युत वितरणाचे खांब जोळ पडलेल्या तारांचेही प्रमाण आहे, तरीही महावितरणकडून काहीही उपाय योजना केल्या जात नाहीत. सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण मु सा काकडे महाविद्यालयाच्या मैदानात असून तेथेही सुव्यवस्था करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)