संत शिरोमणी सावता महाराज महाराष्ट्राला मिळालेली देणगी

खंडाळा ः कार्यक्रमात बोलताना आ. मकरंद पाटील समोर उपस्थित ग्रामस्थ.

आ. मकरंद पाटील ः अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
खंडाळा, दि. 17 (प्रतिनिधी) – संत शिरोमणी सावता महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला मोठी देणगी मिळाली असुन त्यांनी दिलेल्या वैचारिक अशा विचारांच्या सामर्थ्याने समस्त समाजाला योग्य दिशा मिळाली असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी अहिरे, ता. खंडाळा येथे बोलताना सांगितले.
अहिरे येथे संत शिरोमणी सावता महाराज तरुण मंडळाच्यावतीने अखंड हरिनाम व हभप चंद्रकांत महाराज धायगुडे यांचे फुलाचे किर्तन झाले. सकाळी संत सावता महाराज यांचे गाव अरण येथून आणलेल्या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी सावता महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प. अभयानंद महाराज आळंदीकर यांचे काल्याचे किर्तन झाले. याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी कृषी सभापती मनोज पवार, उपसभापती वंदना धायगुडे, पं.स. सदस्या अश्विनी पवार, माजी सभापती रमेश धायगुडे, ऍड. शामराव गाढवे, अजय धायगुडे, मल्हारी जगताप, नंदकुमार धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले की, अहिरे येथे निघालेली मिरवणूक संत सावता महाराजांचे विचार जपणारी आहे. संत सावता महाराजांनी विविध रूढी, परंपराना छेद देत अंधश्रद्धेला मुठमाती देउन भक्तीचा मळा फुलविला. याच भक्तीमय वातावरणात विविध राजकीय पक्षांच्या विचारांचे अनेकजण एकत्र आले ही अतिशय समाधानकारक गोष्ट आहे. दरम्यान कार्यक्रमानंतर मंडळाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी उद्योजक नितीन ओव्हाळ, राजेंद्र जाधव, बबन चौरे, विठ्ठल रासकर, बाबूराव जाधव, प्रमोद होले, संतोष जाधव व संयोजक यांनी परिश्रम घेतले.

 

सभा मंडपासाठी निधी उपलब्ध करणार ः आ. पाटील
अहिरे येथील संत सावता महाराजांचे मंदिर समाजबांधव व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारले असून ही अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. या मंदिराच्या सभा मंडपासाठी आपण लवकरच भरीव तरतूद करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)