संत रामपालची दोन खटल्यातून मुक्तता

हिस्सार (हरियाणा) : सतलोक आश्रमाचा प्रमुख आणि कथित संत रामपालची हिस्सार न्यायालयाने दोन खटल्यातून मुक्तता केली आहे. रामपालवर सरकारी कार्यात अडथळे आणि आश्रमात महिलांना जबरदस्तीने बंधक केल्याचा आरोप होता.
या दोन आरोपांमधून मुक्तता झाल्यानंतरही रामपाल जेलमधून बाहेर येऊ शकणार नाही. कारण त्याच्यावर देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु राहणार आहे. त्यामुळे तो जेलमध्येच राहणार आहे. बाबा रामपालची ज्या प्रकरणात (कलम 426 आणि 427) मुक्तता झाली आहे, ती 2014 मधील आहे. हा सत्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया संत रामपालचा वकील एपी सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हा निकाल 24 ऑगस्टला येणार होता. पण डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचे प्रकरण पाहता, सुरक्षेच्या कारणांमुळे तो टाळण्यात आला होता. रामपालविरोधात देशद्रोहासह अर्धा डझन गुन्हे दाखल असून तो सध्या हिस्सारच्या सेंट्रल जेल-2 मध्ये कैदेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)