संत रविदास बहुउद्देशीय संस्थेमार्फत वृक्षारोपण

चिंचवड- संत रविदास बहुउद्देशीय संस्थेच्यातवीने घोराडेश्‍वर डोंगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेवक भिमा बोबडे, नगरसेवक नामदेव ढाके, कात्रज येथील महिला संघटना व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हा अध्यक्षा लहु वाघमारे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सावरकर मंडळ, निसर्ग मित्र विभाग, निगडी संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. संत रविदास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सकाळी साडे सहा ते नऊ दरम्यान हा कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत लांडगे, शरद झरेकर, नितीन सातपुते, दिनेश जाधव, मनिषा म्हस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)