संत मुक्ताबाई पालखी अनोखा सोहळा: नात घेणार आजोबांचे दर्शन

बीड, दि.20 (प्रतिनिधी) – प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी वारीसाठी श्री. क्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून पंढरीकडे प्रस्थान केलेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी सकाळी एकादशीच्या मुहूर्तावर शहरात आगमन झाले. बीडकरांनी पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपहार देतानाच पादुकांचे दर्शन घेऊन मुक्ताबाई मुक्ताबाई, आदीशक्ती मुक्ताबाईचा जयघोष केला. पालखीचा मंगळवारचा मुक्काम माळीवेस येथील हनुमान मंदिरात असून बुधवारी पेठ बीड भागातील बालाजी मंदिरात पालखी विसावणार आहे.  मागील दहा वर्षांपासून नात-आजोबांच्या भेटीचा अनुपम्य सोहळा हजारो भाविक आपल्या डोळ्यात साठवितात आणि धन्य आजि दिनू सोनियाचा, अमृते पाहिला ही भावना नकळत भाविकांत निर्माण होते.

संत मुक्ताईंचे आजोबा श्री गोविंदपंत कुलकर्णी यांची समाधी शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी किनारी आहे. बालाजी मंदिरातील पंढरीकडे मार्गस्थ होताना नात मुक्ताई आजोबांच्या दर्शनाला जाणार आहेत. मागील दहा वर्षांपासून नात-आजोबांच्या भेटीचा अनुपम्य सोहळा हजारो भाविक आपल्या डोळ्यात साठवितात आणि धन्य आजि दिनू सोनियाचा, अमृते पाहिला ही भावना नकळत साऱ्यात भाविकांत निर्माण होते. आजोबा श्री गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी सभागृहात उभारण्यात आले असून संयोजकांकडून नात मुक्ताईला साडीचोळीचा आहेर देऊन ओटी भरली जाते. संपूर्ण राज्यात नात- आजोबांच्या भेटीचा हा अनोखा सोहळा केवळ बीडकरांना अनुभवयास येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)