संत भगवानबाबा पतसंस्थेला साडेतीन लाख रुपयांचा नफा

अध्यक्ष दिलीप आघाव यांची माहिती
राहुरी – येथील संत भगवानबाबा पतसंस्थेला पहिल्याच वर्षात साडेतीन लाख रुपये नफा झाला आहे. सभासद, ठेवीदार, ग्राहक यांच्या विश्‍वासावर संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप आघाव यांनी दिली. संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने व त्यांच्या विचाराने स्थापित केलेल्या संत भगवानबाबा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या एकूण ठेवी 1 कोटी 10 लाख रुपये आहेत. कर्जवाटप 53 लाख 20 रुपये आहे. अधिकृत भागभांडवल 19 लाख 40 हजार रुपये आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल 12 कोटी 60 लाख रुपये इतकी झाली. संस्था तपासणी वर्ग “अ’ हा आहे. संस्थेचा एनपीए शून्य टक्के आहे. कर्जवसुलीत नियमितता ठेवल्याने अनेक बेरोजगारांना संस्थेने स्वतःच्या पायावर उभे केले आहे. सर्वसामान्य व छोट्या व्यावसायिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या आर्थिक स्थैर्यात संस्था अग्रभागी राहिली आहे. यामुळेच सर्वसामान्यांचा विश्‍वास संस्थेवर आहे. यात संचालक मंडळ सर्वश्री सोमनाथ तनपुरे, बाळासाहेब आघाव, विजय पालवे, सतीश पावटे, लक्ष्मण आघाव, भास्कर आघाव, गणेश पोपळघट, यमनाजी आघाव, अमित साळवे, शीतल ठोकळे, पवन कल्हापुरे आदींचे सहकार्य लाभत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)