संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचा गौरव

लोणी काळभोर- प्रादेशिक रक्तपेढी,ससून रुग्णालय, पुणे यांच्या वतीने सर्वाधिक रक्तदान करणारी सेवाभावी संस्था म्हणून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनला गौरविण्यात आले आहे. देशात प्रत्येक दिवशी 38000 रक्तदात्यांची गरज असते. या सामाजिक कार्याची जाणीव ठेवून अनेक संस्था निःस्वार्थ भावनेने आपले योगदान देत असतात. प्राण वाचवण्यात मोलाचे ठरणाऱ्या रक्ताची किंमत अमूल्य असते, असे हे श्रेष्ठदान सर्वाधिक संख्येने करून अनेकांचे प्राण वाचविले म्हणून प्रादेशिक रक्तपेढी ससून रुग्णालय, पुणे यांच्याद्वारे बि. जे. वैद्यकीय महाविद्यालय पॅथोलोजी लेक्‍चर हॉल येथे संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन या संस्थेचा सत्कार करण्यात आला. संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारा एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 20 रक्तदान शिबीरातून 4552 युनिट रक्त जमा करण्यात आले होते, तर यावर्षी एप्रिल 2018 पासून आतापर्यंत 4221 युनिट रक्त संकलित करण्यात आले असून मार्च 2019 पर्यंत अजून 10 रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला प्रभारी अधिष्ठाता ससून डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजय तावरे, संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी, रोटरी क्‍लबच्या मिरा दमानी, डॉ. कोरके, डॉ. लीना नखाते, डॉ. नलिनी काडगी आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)