संत नामदेव समाधी सोहळ्यानिमित्त साताऱ्यात मिरवणूक

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) -संत नामदेव समाधी सोहळ्यानिमित्त शुक्रवार, दि. 10 रोजी सातारा येथील नामदेव मंदिर खण आळी सातारा येथे सकाळी नामदेव महाराजांच्या मुर्तीस अभिषेक घालण्यात आला. दरम्यान, सकाळी आठ वाजता आरती होऊन नामदेव महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.
संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त साताऱ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता खण आळीतील मंदिरात नामदेव महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करून त्यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीस खणआळीतील नामदेव मंदिरापासून प्रारंभ झाला. शनिवार पेठ, 501 पाटी मार्गे, शनिमंदिर मार्गे देवी चौक, कन्या शाळा सिटी पोस्ट मार्गे निघून विठ्ठल रखुमाई मंदिर येथे मिरवणुक आल्यानंतर आरती करण्यात आली. दुपारी बारा वाजता सुनील भानुदास बोधे यांचे किर्तन झाले. 2 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, ज्ञानेश्‍वरी पारायण व सातारचे विविध ठिकाणचे महिला भजनी मंडळाचे कार्यक्रम तसेच गायत्री गणेश जामदर, अकलूज यांचे नारदीय किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी सातारा येथील सर्व शिंपी समाज बांधव, महिला कार्यकर्ते यांचा उत्स्फुर्त सहभाग होता. सातारा शहर नगर परिषद येथेही संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेस नगराध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)