संत तुकोबांच्या जन्मोत्सवनिमित्त देहूत राज्यस्तरीय वक्‍तृत्व स्पर्धा

देहुरोड – जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त युथ क्‍लब ऑफ देहूच्या वतीने येथील वैकुंठ स्थान (गोपाळपुरा) येथे राज्यस्तरीय वक्‍तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये राज्यातील 75 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल आणि वक्‍तृत्त्व विषय पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक – उमेश सूर्यवंशी (वंशाची लखलखती ज्योत), नितीन नगरकर (तुका आकाशा एवढा), द्वितीय क्रमांक – भक्‍ती देशमुख (तुका आकाशा एवढा), अंकुल पवार (चित्रपट प्रबोधनाचे माध्यम की वादाचे), तृतीय क्रमांक – धोंडीबा टकले (जागतिक शांतता एक स्वप्न?), निकिता पाटील (जागतिक शांतता एक स्वप्न?).

उत्तेजनार्थ आदित्य माने (तुका आकाशा एवढा), स्नेहल आटोळे (वंशाची लखलखती ज्योत), तुषार गांगुर्डे (ज्ञान देवे रचिला पाया/तुका झालासे कळस), स्वप्नील सातकर (जगाचा अन्नदाता झोपतोय उपाशी). संत साहित्याचे व्याख्याते सचिन पवार, विजय बोत्रे, प्रदीप कदम, निलेश महसाये आदी उपस्थित्यांनी स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देवून सन्मानीत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्‍लबचे अनिकेत मोरे, नवाजीस शेख, सिद्धांत मांढरे, अनिल टोम्पे, ऋषिकेश साळुंके, शुभम बेलदार आदींनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)