वडगाव मावळ – वडगाव मावळ येथील जाधव कुटुंबीयांच्या वतीने आळंदी देवस्थान ट्रस्टसाठी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पंढरपूर पायी पालखी सोहळ्यासाठी रथ प्रदान करण्यात येणार आहे.

त्यापूर्वी मंगळवारी (दि. 17) सकाळी या पालखी रथाची वडगाव येथे मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती रघुनाथराव तथा पंडितराव जाधव यांनी दिली आहे. जाधव कुटुंबीयांच्या वतीने स्वखर्चाने माऊंलीच्या पालखी सोहळ्यासाठी रथ बनविण्यात आला असून तो मंगळवारी आळंदी देवस्थान ट्रस्टला प्रदान करण्यात येणार आहे. तत्पुर्वी सकाळी 9 वाजता पंचायत समिती चौकापासून बॅंड पथक व आळंदी येथील बाल वारकऱ्यांच्या सहभागाने रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. आळंदी देवस्थानचे सर्व ट्रस्टी व अन्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती पंडितराव जाधव यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)