संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास सर्व सुविधा देणार

जेजुरी- प्रांत अधिकारी संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी, पालिकेतील सर्व नगसेवक तसेच पालखी सोहळ्यातील मान्यवरांच्या सुचनांचे पालन करून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवाना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी जेजुरी पालिकेच्या वतीने सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे नगरध्यक्षा वीना सोनवणे यांनी सांगितले.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जुलै महिन्यात सुरु होणार असून या सोहळ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने सोहळा प्रमुखांनी मंगळवारी (दि. 20) जेजुरी पालिकेला भेट देऊन प्रशासकीय अधिकारी, नगरध्यक्षा व नगरसेवक यांच्याशी चर्चा केली. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, योगेश देसाई, पालखी सोहळ्याचे बाळासाहेब आरफळकर, बाळसाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, मारुती कोकाटे,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने भोर विभागाचे प्रांत अधिकारी संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी, जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक बाळसाहेब सातभाई, गणेश शिंदे, अरुण बारभाई, अजिंक्‍य देशमुख, महेश दरेकर, नगरसेविका पोर्णिमा राऊत, रुक्‍मिणी जगताप शीतल बयास, माजी नगरध्यक्ष रोहिदास कुंभार माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, पालिका अधिकारी राजेंद्र गाढवे, सोमनाथ नारळकर, बाळसाहेब खोमणे, कन्हैया लाखे, वंदना चीव्हे आदी उपस्थित होते.
यावर्षी अधिकमासामुळे पालखी सोहळा उशिरा सुरु होत असुन जुलै महिन्यात पावसाची शक्‍यता असून पालिकेने व प्रशासनाने औद्योगिक वसाहतीतील मोकळे शेड व मोकळ्या जागेची व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी तात्पुरती शौचालये उभारण्यात येतील तेथे पाणी, लाईट, स्वच्छतेची सुविधा पालिकेने द्यावी, अशा सूचना पालखी सोहळ्यातील पदाधिकाऱ्यांनी दिल्या. लोणारी समाजाची जागा उपलब्ध न झाल्यास पर्यायी जागा म्हणून होळकर तलावा वरील असणाऱ्या जागेची पाहणी सोहळा समितीने यावेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)