संतोष सौंदणकर यांचे उपोषण मागे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रॅक्‍टर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष व विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांचा रद्द केलेला ठेका परवाना पूर्ववत देण्याचे आश्‍वासन महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिले आहे. त्यानंतर सौंदणकर यांनी उपोषण मागे घेतले.

तांत्रिक दुय्यम चुका असल्याचे दाखवत, सौंदणकर यांच्या न्यू सिमरन एन्टरप्रायझेस या फर्मचा विद्युत ठेकेदारीचा परवाना महावितरणने रद्द केला होता. त्यामुळे इलेक्‍ट्रिकल कंत्राटदार व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. 26) रस्ता पेठ येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणस्थळी भेट देत या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दर्शविला. त्यानंतर महावितरणने सौंदणकर यांना पुन्हा परवाना देण्याचे मान्य केले. महावितरणच्या वतीने मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी निवेदन स्वीकारले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत सौंदणकर म्हणाले की, मी जनतेच्या प्रश्‍नासाठी महावितरण विरोधात भांडतो. परिणामी माझ्यावर खोटे आरोप करून दबाव आणून माझा परवाना रद्द केला. लोकप्रतिनिधी म्हणून न्याय मिळविण्यासाठी नेहमी आग्रही राहिलो. प्रशासन आपले अपयश झाकण्यासाठी उलट माझ्यावरच आरोप केले. मात्र, शिवसेना पक्ष व कॉन्ट्रॅक्‍टरबांधव माझ्या पाठीशी उभे राहिले. शेवटी सत्याचा विजय झाला. भ्रष्टाचार उघडकीस आणणे हा गुन्हा असेल; तर हा गुन्हा वारंवार करीत मी राहीन, असा इशाराही सौंदणकर यांनी यावेळी दिला.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुलभा उबाळे, गजानन थरकुडे, संजय मोरे, विद्युत सनियंत्रण समिती सदस्य विश्‍वास ननावरे, नितीन बोंडे, जावेद मुजावर, दिगंबर बोबडे, अरुण बडगुजर, संजय मोरे, आकाश भराटे, शशिकला उभे, जितेंद्र ननावरे, किरण मोट, सतीश मरळ, गजानन पंडित, सुधाकर नलावडे, राजेश मोरे, चंद्रकांत अंबिलवादे, नानासाहेब निकम, भालचंद्र सावंत, जनाबाई गोरे, प्रदीप बेळगावकर तसेच पिंपरी-चिंचवड इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशन, पुणे जिल्हा इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशन, इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे पदाधिकारी, सभासद आदी उपस्थित होते. मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी आश्‍वासन दिल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता संतोष सौंदणकर यांनी उपोषण मागे घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)