संतोष पोळला तुरुंगात मारहाण

ऍड. हुटगीकर यांचा आरोप

सातारा – वाई येथील कथित डॉक्‍टर संतोष पोळ याने केलेल्या खुनाच्या आरोपाखाली कळंबा कारागृह कोल्हापूर येथे बंदिस्त असताना त्याच्याकडून पिस्तुल व मोबाईल असलेली व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर संतोष पोळला पोलिसांकडून जबरी मारहाण करण्यात आली, असा आरोप त्याचे वकिल श्रीकांत हुटगीकर केला आहे.

-Ads-

याबाबत माहिती अशी की, वाई येथील डॉ. घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या संतोष पोळ याने दागिने आणि पैशाच्या हव्यासापोटी पाच महिलांसह सहा जणांना इंजेक्‍शन देऊन खून केला. मंगला जेधे यांच्या खूनानंतर संतोष पोळ याने केलेली सर्व खुनप्रकरणे उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी संतोष पोळला अटक करून सहा जणांचे मृतदेह ताब्यात घेतले.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यासाठी सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष कोल्हापूर येथे बंदी असताना त्याच्या जवळ पिस्तुल, मोबाईल असलेली व्हिडिओ रेकॉर्ड प्रसिद्ध झाल्यामुळे जेल प्रशासन व पोलिसांकडून त्याला जबर मारहाण झाली, असा आरोप बचाव पक्षाचे वकील श्रीकांत हुटगीकर यांनी केला आहे.

त्यांनी न्यायालयात अर्ज करून संतोष पोळच्या संपूर्ण शरीराचे एक्‍स-रे काढण्यात यावेत, तसेच वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. संतोष पोळला कारागृहात मारहाण झाल्याचे सूत्रांकडून समजले असून त्याबाबत त्याचा कोर्टात जबाब घेण्यात यावा तसेच त्याच्या वैद्यकीय तपासणी करून तसा अहवाल त्वरित न्यायालयात सादर करण्याची मागणीही हुटगीकर यांनी केली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)