संतोष पोळचे सर्व खटले चालणार वेगवेगळे

सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सरकारी पक्षाचा नकार

सातारा,दि.23(प्रतिनिधी) – वाईसह संपूर्ण जिल्ह्याला हादरवुन सोडणाऱ्या हत्याकांड प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय सरकारी पक्षाने मान्य केला. त्यामुळे या हत्याकांडातील सर्वच्या सर्व खटल्यांची सुनावणी यापुढे वेगवेगळी चालणार आहे. सर्व खटले एकत्र चालावेत यासाठी सरकारी पक्षाने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र त्याला बचाव पक्षाने विरोध केला होता. त्यावर सुनावणी घेत जिल्हा न्यायालयाने खटले वेगवेगळे चालवण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात सर्वोच न्यायालयात जाण्यास सरकारी पक्षाने नकार दिला. त्यामुळे सर्व सहा खटले स्वतंत्रपणे चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-

शुक्रवारी जिल्हा न्यायालयात वाई हत्याकांडाची सुनावणी होती. यासाठी ऍड. उज्ज्वल निकम हजर होते. त्यांनी न्यायालयात वाई हत्याकांडामध्ये मंगल जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी यांच्या खुनाबाबत जंत्री सादर केली. संतोष पोळ याने कट रचून इंग्जेक्‍शन देवून खून केले असल्याची बाजू न्यायालयात मांडली. यावर आता संशयित आरोपीचे वकील बाजू मांडणार आहे. दरम्यान, या तिन्ही खटल्याची आता 26,27,28 डिसेंबर रोजी न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे.

डॉ.संतोष पोळ याने केलेल्या हत्याकांडातील पहिल्या तीन खटल्यांची नियमित सुनावणी 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्याच्या नियमित सुणावनीसाठी सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम साताऱ्यात आले होते. दरम्यान याप्रकरणातील माफीचा साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

वाई शहरासह परिसरात पाच महिला व एका पुरुषाचा संतोष पोळ याने इंजेक्‍शन देवून खुन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.दोन वर्षापूर्वी समोर आलेल्या या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती.

पंधरा वर्षात संतोष पोळ याने वैद्यकीय ज्ञानाचा गैरफायदा घेवून स्वत:च्या फायद्यासाठी सहा खून करुन त्यांचे दागिने व पैसे चोरले. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संतोष पोळ याचा पर्दाफाश केल्यानंतर वाई पोलिसांनी या घटनांचा तपास करुन न्यायालयात संतोष पोळ व ज्योती मांढरे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यासाठी शासनाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली गेली. वाई हत्याकांडाचे दोषारोपपत्र सातारा जिल्हा न्यायालयात दाखल झाल्यानंतर या सर्व घटना वेगवेगळ्या असल्याने त्याचे न्यायालयीन कामकाज स्वतंत्र चालवे अशी मागणी संतोष पोळ याच्यावतीने बचाव पक्षाने केली. मात्र खूनांची मालिका एकानेच केल्याने तसेच न्यायालयाचा वेळ अधिक वाया जावू नये यासाठी हा खटला एकत्रितच चालवावा अशी सरकार पक्षाची मागणी होती.

जिल्हा न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन वाई हत्याकांड खटला वेगवेगळा चालणार असल्याचे स्पष्ट केले होते. जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात सरकार पक्ष उच्च न्यायालयात गेला. मात्र तेथेही सरकार पक्षाची मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात का असे सरकारी पक्षाला विचारले. त्यावर त्यांनी नकार दिल्याने या खटल्याची सुनावणी दि.26 डिसेंबर पासून नियमीत सुरू होणार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)