संजू सॅमसनदेखील यो-यो चाचणीत नापास 

मुंबई – भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआय’ने अनिवार्य केलेल्या यो यो (सहनशीलता) चाचणीत वेगवान गोलंदाज महंमद शमीपाठोपाठ भारत “अ’ संघातील संजू सॅमसनदेखील अपयशी ठरल्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ’ संघातून वगळण्यात आले आहे. भारतीय संघात निवड होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला यो यो चाचणी आवश्‍यक आहे. या चाचणीत सॅमसनला 16.1 गुण मिळाल्याची माहिती मिळत आहे. नुकत्यात संपलेल्या आयपीएलमध्ये राजस्थान संघातून खेळताना सॅमसनने चांगली कामगिरी केली होती. काही हलक्‍या दुखापती झालेल्या असल्यामुळे सॅमसन यो-यो चाचणीत उत्तीर्ण होऊ शकला नाही, असेही सांगण्यात येत आहे.

वेगवान गोलंदाज महंमद शमीदेखील चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याला स्थान देण्यात आले आहे. या चाचणीमध्ये हार्दिक पांड्या आणि करुण नायर हे दोन खेळाडू सर्वाधिक गुणांनी पास झाल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ इंग्लंडला रवाना झाला असून, संजू सॅमसन संघासोबत गेला नसल्याची माहिती समोर येते आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी यो-यो फिटनेस टेस्ट अनिवार्य केली आहे. इंग्लंड दौऱ्यात टी-20 आणि वन-डे सामन्यांसाठी संजू सॅमसनची संघात निवड झाली होती. मात्र यो-यो टेस्टमध्ये संजूने फक्त 16.1 गुण नोंदवले, त्याची ही कामगिरी इंग्लंड दौऱ्यासाठी पुरेशी नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलेलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)