“संजू’ विरोधात तक्रार…

अभिनेता रणबीर कपूर याची प्रमुख भूमिका असलेल्या आणि संजय दत्तचा चित्रपट असलेल्या “संजू’ चित्रपटाच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल झाली आहे. या चित्रपटात देहविक्री करणाऱ्या महिलांबाबत अवमानकारक संवाद असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. गौरव गुलाटी नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने ही तक्रार दाखल केली आहे. रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी देहविक्री करणाऱ्या महिलांबाबत अवमानकारक भाषा वापरली आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्हाला अशी तक्रार मिळाली आहे आणि आम्ही ती इलेक्‍ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्राकडे पाठविली आहे, असे शर्मा यांनी सांगितले. हे केंद्र केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत येते. टीव्हीवरील कार्यक्रमांवर लक्ष ठेवून आचारसंहिता भंग झाल्यास त्याची माहिती देण्यचे काम या केंद्राकडे आहे.

गुलाटी यांनी चित्रपटातील दोन संवादांवर आक्षेप घेतला आहे. रणबीर कपूरच्या तोंडी असलेल्या या संवादात समाजातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या स्थितीवर वाईट टिप्पणी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)