‘संजू’ चा टीझर पाहताच ऋषि कपूर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात संजय दत्त यांची भूमिका रणबीर कपूरने साकारली आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला. त्यापुर्वी  चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक विधू विनोद चोपडा आणि राजकुमार हिरानी यांनी हा टीझर ऋषि कपूर यांना दाखविला. ऋषि कपूर यांनी वेगळ्या अंदाजात रणबीरचे कौतूक केल्याचे पहायला मिळाले.

‘संजू’चा टीझर पाहिल्यानंतर त्यांनी रणबीरचं तोंडभरुन कौतूक केलं. या चित्रपटामध्ये रणबीरची भूमिका आणि त्यांचा लूक पाहून काही काळ संजय दत्तलाच आपण या चित्रपटात पाहत असल्याचा भास झाल्याचं त्यांनी सांगितलं. रणबीरची ही भूमिका पाहून त्यांच्याविषयीच्या माझ्या सा-या तक्रारी संपल्या असून मला त्याचा प्रचंड अभिमान वाटत असल्याची भावना ऋषि यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)