‘संजू’ला 2018 मधील सर्वात मोठी ओपनिंग

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपटाला 2018 वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 34.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर अशी कलाकारांची फौज आहे.

2018 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘संजू’ने सलमान खानचा ‘रेस 3’, टायगर श्रॉफचा ‘बागी 2’ आणि दीपिका-रणवीरच्या ‘पद्मावत’ या चित्रपटांना मागे टाकले. सलमान खानच्या ‘रेस-3’ ने पहिल्या दिवशी 29.17 कोटी, ‘बागी-2’ ने 25.10 कोटी कमावले होते. चौथ्या क्रमांकावर ‘पद्मावत’ (19 कोटी) तर पाचव्या क्रमांकावर ‘वीरे दी वेडिंग (10.70 कोटी) आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नॉन हॉलिडे (बँक हॉलिडे नसलेल्या शुक्रवारी) प्रदर्शित होऊन सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही संजूने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बॉलिवूडच्या इतिहासात ‘संजू’ हा नॉन हॉलिडेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. ‘बाहुबली’ (122 कोटी) हा या यादीतील अव्वल चित्रपट आहे. रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रणवीरच्या चित्रपटांमध्ये ‘बेशरम’ने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती.

https://twitter.com/taran_adarsh/status/1012944624216956929

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)