संजूबाबाही करनार डायरेक्‍शन

संजय दत्त काही दिवसांपासून “कलंक’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्याच्याव्यतिरिक्‍त त्याने काही नवीन सिनेमे साईन केलेले आहेत. त्यात “पानिपत’, “प्रस्थानम’ आणि “समशेरा’सारख्या सिनेमांचा समावेश आहे. पण त्याव्यतिरिक्‍त संजय दत्तबाबतची खास खबर म्हणजे तो आता डायरेक्‍टरच्या खुर्चीवर बसतो आहे. त्याने स्वतःच काही दिवसांपूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये ही माहिती सांगितली होती. आपल्याला आपल्या पूर्वजांवर आधारीत एक सिनेमा बनवायचा आहे, असे तो म्हणाला होता. हा एक ऐतिहासिक पार्श्‍वभुमीचा सिनेमा असेल. संजय दत्तचे पूर्वज मोहयल यांच्या संदर्भातील कथा त्यामध्ये असणार आहे. मोहयल हे क्षत्रिय ब्राम्हण होते. त्यांनी पैगंबरांच्या नातवासाठी युद्ध केले होते.

संजय दत्त स्वतः आणि त्याची टीम गेल्या काही दिवसांपासून या विषयावर काम करत आहेत. संजय दत्तने हा सिनेमा स्वतःच्या प्रॉडक्‍शन हाऊसद्वारेच प्रोड्युस करायचे ठरवले आहे. या सिनेमात स्वतः संजय मोहयलचा मुखिया साहिब सिन दत्त यांचा रोल करणार आहे. सिनेमाच्या कथेवरचे काम पूर्ण झाल्यावरच त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. पण तोपर्यंत तो “कलंक’चे प्रमोशन, रिलीज आणि सक्‍सेस एन्जॉय करणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)