“संजू’नंतर रणबीर कपूरला आणखी एका बायोपिकची ऑफर

“संजू’ सुपर हिट झाला आणि रणबीर कपूरची मार्केट व्हॅल्यू चांगलीच वाढली. त्याला आणखी एका बायोपिकमध्ये लीड रोल साकारण्याची ऑफर आली आहे. म्युझिक किंग गुलशन कुमार यांच्या जीवनावरील “मुगल’ या सिनेमासाठी रणबीरला विचारण्यात आले आहे. ही ऑफर देखील त्याला कोणी अन्य व्यक्‍तीने नव्हे तर खुद्द आमिर खानने दिली आहे.

गुलशन कुमार यांचे पुत्र भूषण कुमारनी 2007 मध्येच या बायोपिकची घोषणा केली होती. या बायोपिकमध्ये गुलशन कुमार यांच्या रोलसाठी अक्षय कुमारची निवड झाली होती. मात्र त्यानंतर या सिनेमाबाबत काहीच अपडेट नव्हता. मात्र अचानक समजले की अक्षयने हा सिनेमा सोडून दिला. त्यानंतर या सिनेमामध्ये कोणत्या कलाकाराची निवड केली जाणार याबाबत अंदाज व्यक्‍त केले जाऊ लागले होते.

-Ads-

यामध्ये आमिर खानचे नाव आघाडीवर होते. “दंगल’मधून आमिर खानने पहिल्यांदा बायोपिक रोल केला होता. मात्र आता आमिर खानने गुलशन कुमार यांच्या रोलसाठी रण्बीर कपूरच्या नावाची शिफारस केल्याचे समजते आहे. “संजू’मध्ये रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका ज्या इमानदारीने आणि कष्टपूर्वक साकारली आहे, ती पाहून इतरांप्रमाणे आमिरही प्रभावित झाला आहे. सध्या याबाबत चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)