संजीवनीतील विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासाठी कंपन्यांची स्पर्धा

बिपीन कोल्हे : संजीवनी शैक्षणिक संकुलामध्ये दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
कोपरगाव – संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लष्करी सैनिकांपासून ते नामांकित कंपन्यांच्या सीईओपदाकरिता आवश्‍यक असणारे उत्तम दर्जाचे शिक्षण देवून विद्यार्थ्यांना घडविले जाते. त्यामुळेच जगातील सर्व ठिकाणाहून येथील शिक्षीत तरुणांना 20 हजार रुपयांपासून ते नऊ लाख रूपये मासिक पगारापर्यंत नोकऱ्या देण्यासाठी विविध कंपन्यांची येथे स्पर्धा निर्माण होते, अशी माहिती संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.
संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्‌स यांच्या वतीने संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या सभागृहामध्ये गुरुवारी (दि.14) कोपरगाव विधानसभा मतरदारसंघाची 10 वी, 12 वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी कोल्हे बोलत होते.
व्यासपीठावर संजीवनी शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त अमित कोल्हे, प्राचार्य डॉ. डी. एन. क्‍यातनवार, उपप्राचार्य डॉ. ए. जी. ठाकुर, डॉ. मिरीकर, संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शिवसेनेचे कैलास जाधव, संचालक अशोक औताडे, निवृत्ती बनकर, साईनाथ रोहमारे, भास्करराव भिंगारे, पोपटराव पगारे, फकिरराव बोरनारे, पांडुरंग शिंदे, राजेंद्र नरोडे, राजेंद्र काळपे, सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, हरिभाऊ गिरमे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा बिपीन कोल्हे, अमित कोल्हे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक उपप्राचार्य ए. जी. ठाकुर यांनी केले. यावेळी डॉ. मिरीकर, डॉ. शेंडगे यांनी विद्यार्थी, पालक यांना शैक्षणिक वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले. प्रा. साहेबराव दवंगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

28 पेटंट मिळविणारी शिक्षण संस्था..
बिपीन कोल्हे म्हणाले की, संजीवनी शिक्षण संस्थेने देश व राज्यपातळीवर आपले नाव कोरले आहे. या संस्थेत शिक्षण देणाऱ्या शिक्षकांमध्ये तब्बल 60 शिक्षक पीएच.डीधारक आहेत. संजीवनी स्वतःचे 28 पेटेंट मिळवणारी ग्रामीण भागातील एकमेव शिक्षण संस्था आहे. संजीवनी समूह सर्वांशी एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागतात. येथे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळते. संस्थेच्या वतीने मोफत करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याने येथे आतापर्यंत चालू वर्षी 4 हजार मुलांनी याचा लाभ घेतला. तालुक्‍यातील मुलांबरोबरच इतर जिल्ह्यातील पालक मुलांना याचा फायदा होत आहे, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)