“संजीवनी’च्या 24 विद्यार्थ्यांची कंपनीसाठी निवड

कोपरगाव, दि. 19 (प्रतिनिधी) – संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 24 विद्यार्थ्यांची सिनेक्रॉन कंपनीसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली. निवड झालेल्यांना 3 लाख 20 हजाराचे वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे. प्रतीक दवंगे, गायत्री परजणे, धनश्री गवळी, सौरभ मंटाला, प्रियंका औताडे, रूपाली भोसले, ईषा कदम, अमृता जपे, राजश्री बोरावके, अमेय पाचपुते, प्रियंका पवार, शुभम राऊत, आरती जोर्वेकर, श्रीरंग कदम, आमरीन शेख, रोशनी थोरे, प्रियंका गवळी, जयश्री शिंदे, गायत्री शिंपी, स्नेहल देवरे, रोहिणी लाटे, साधना पाटील, पल्लवी खुरूड आणि रूपाली नवले यांची कंपनीसाठी निवड झाली.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सांगितले की, सध्या देशातील दहा हजारांहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून सात लाखांहून अधिक अभियंते दरवर्षी बाहेर पडतात. त्यातील 60 टक्के अभियंत्यांना आज नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत, ही गंभीर बाब केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. या परिस्थितीचा अभ्यास करून “संजीवनी’ने विद्यार्थ्यांना तज्ज्ञांमार्फत आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, प्रत्यक्ष प्रकल्पांना भेटी देऊन तेथील अभियांत्रिकी कार्यपध्दतीचा अभ्यास करणे, तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत उद्योग जगताला अपेक्षित असणाऱ्या गरजांचा अभ्यास करणे, असे सूत्र अवलंबले आहे. अधिष्ठाता एस. एस. इंगळे आणि संजय गवळी विविध कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागांशी कायम संपर्क ठेवून असतात, असेही कोल्हे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)