संजय लिला भन्साळीच्या सिनेमाला हृतिकचा ‘ना होकार, ना नकार’ 

संजय लिला भन्साळी आणि हृतिक रोशन यांच्यातले व्यवसायिक संबंध बऱ्यापैकी पक्के आहेत. ‘गुजारिश’ पासून या दोघांनी एकत्र काम केले आहे. हा सिनेमा बॉक्‍स ऑफिसवर फारसा चालला नव्हता, पण चित्रपट विश्‍लेषकांनी मात्र या सिनेमाचे खूप कौतुक केले होते. आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्‍यता आहे. संजय लिला भन्साळीने आपल्या आगामी सिनेमासाठी हृतिकला विचारले आहे. मात्र हृतिकने अद्याप या ऑफरला होकार किंवा नकारही दिलेला नाही. 

हा सिनेमा मल्याळम ‘पुलीमुरुगन’चा हिंदी रिमेक असणार आहे. पहिल्यांदा तर हृतिक रोशनने या रिमेक फिल्ममध्ये काम करण्यास सपशेल नकारच देऊन टाकला होता. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये हृतिकबाबत अचानक चर्चेला सुरुवात झाली. संजयलिला भन्साळींसारख्या नावाजलेल्या निर्माता दिग्दर्शकाच्या सिनेमाला नकार देण्यासाठी खरोखरच हिंमत असायला पाहिजे. हृतिककडे ही हिंमत आहे, असे बोलले जाऊ लागले.

पण हृतिकला जेंव्हा या चर्चेबद्दल समजले, तेंव्हा त्याने हा समज दूर करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्याबद्दल निर्माण झालेली ही अफवा फेटाळून लावली आहे. त्याने सोशल मिडीयावरून याबाबतचे स्पष्टिकरण दिले आहे. “चुकीच्या बातम्या पसरवू नका. चुकीची पत्रकारिता किंवा ईमानदारीने केलेली चूक दोन्ही सारखेच चूकीचे असते. यापैकी नेमके सत्य काय ते सांगता येऊ शकणार नाही. त्यामुळे शांत रहावे.’ असे त्याने म्हटले आहे. मात्र आपल्या या पोस्टमध्ये त्याने संजय लिला भन्साळीचा सिनेमा करणार की नाही, याचे स्पष्टिकरण त्याने दिलेले नाही.

सध्या हृतिक आनंद कुमारचा बायोपिक असलेल्या “सुपर 3.0’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर त्याने आपले होम प्रोडक्‍शन असलेल्या “क्रिश 4′ ची तयारीही सुरू केली आहे. शिवाय टायगर श्रॉफबरोबरच्या एका सिनेमामध्ये तो एक महत्वाचा रोलही करणार आहे. एवढा व्यस्त असल्यानेच कदाचित त्याने संजय लिला भन्साळीच्या सिनेमाला थोडा वेळ होल्डवर ठेवले असावे, असे वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)