संजय भिसे उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

पिंपरी- पुणे येथील शिवप्रताप प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणार उद्योगरत्न पुरस्कार यंदा पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांना देण्यात आला. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, तसेच ऍड अपर्णा रामतीर्थकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्‍तींचाही सन्मान करण्यात आला. यात हनुमंत गायकवाड, डॉ रवींद्र पोमण, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, सचिन सातव, अभिजीत धोत्रे, जन्मेजयराज भोसले, संग्राम चौघुले, सुनील भजनावळे, श्रीगौरी सावंत, विजय चौधरी व डॉ हंसराज थोरात यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुणे येथील जनता वसाहत येथे कॅनल फुटल्याने वाहत्या पाण्यात अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले अडकली होती. त्यापैकी एका मुलाचे प्राण वाचवणाऱ्या महिला पोलीस नीलम गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

-Ads-

यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे ,उदय परदेशी, गणेश परदेशी, केदार पाटील, पृथ्वीराज परदेशी, जयराज परदेशी, प्रदीप कांबळे, चंद्र शेखर कोरडे, गिरीश घोरपडे नंदकुमार बोके, संदीप पांढरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विजय बोत्रे पाटील यांनी सूत्रसंचालन तर मिलिंद परदेशी व आनंद परदेशी यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)