मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशिक्षित, अडाणी अशा शब्द प्रयोग करणारे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम हेच “मानसिक रोगी’ आहेत, असा टोला भाजपाच्या शायना एनसी यांनी निरूपम यांना लगाविला आहे. शायना एनसी यांनी ट्विटरद्नारे निरुपम यांच्यावर ही टीका केली आहे.

संजय निरूपम यांनी पुन्हा एकदा असभ्य टिप्पणी केली आहे. 125 कोटी भारतीयांनी नरेद्र मोदी यांना निवडून दिले आहे. ते आज देशाच्या पंतप्रधान पदावर आहेत याचा कदाचीत निरूपम यांना विसर पडला असावा, असे शायना एनसी यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. तर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही निरूपम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि सभ्य माणसाला न शोभणारे हे वक्तव्य असल्याची टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींवर काढण्यात आलेला चित्रपट मुलांना दाखवण्याचा प्रयत्न केला जात असून हे अत्यंत चुकीचे आहे. मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त करताना निरूपम यांनी जी मुले शाळा, महाविद्यालयात शिकत आहेत. त्यांना मोदींसारख्या अशिक्षित, अडाणी व्यक्तीबाबत जाणून घेऊन काय मिळणार आहे ? ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे की आजही आमच्या देशातील नागरिक आणि मुलांना आमच्या पंतप्रधानांकडे कोणती पदवी आहे याचीच माहीत नाही, असे वक्तव्य संजय निरूपम यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)