संजय निरूपम यांच्या विरोधातील वॉरंट कायम

नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात जारी करण्यात आलेले समन्स दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायालयाने इराणी यांनी दाखल केलेल्या बदनामी खटल्यात निरूपम यांच्यावर बजावलेले समन्स रद्द करण्याची याचिका मात्र फेटाळली आहे. निरूपम यांच्यावर जारी केलेले वॉरंट कायम राहील, असे न्यायालयाने सांगितले.

न्या. आर. के. गौबा यांनी या प्रकरणात दोन वेगवेगळे निकाल दिले आहेत. इराणी व निरूपम यांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या खटल्यात समन्स रद्द करण्यासाठी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. या बाबतच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने 13 नोव्हेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही नेत्यांनी बदनामीच्या खटल्यात तडजोड करावी, असे सुचवण्यात आले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी दूरचित्रवाणी चर्चेत आपल्या विरोधात इराणी यांनी चारित्र्यहनन करणारे वक्तव्य केले होते, अशी तक्रार निरूपम यांनी 20 डिसेंबर 2012 रोजी केली होती. त्याच चर्चेत बदनामी केल्याच्या आरोपावरून इराणी यांनीही कॉंग्रेसचे माजी खासदार निरूपम यांच्या विरोधात बदनामीची फिर्याद दाखल केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)