संजय दत्त लिहिणार आत्मचरित्र…

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असलेला रणबीर कपूरचा “संजू’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता “संजू’नंतर संजय दत्तचे आत्मचरित्र त्याच्याच शब्दांत वाचायला मिळणार आहे. होय, संजय दत्तने आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला असून पुढील वर्षी 29 जुलैला संजयच्या वाढदिवसाला या आत्मचरित्राचे प्रकाशन करणार आहे.

संजयच्या अभिनय क्षेत्रातील उपलब्धींसोबतच त्याच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार हार्पर कॉलिन्स प्रकाशित करणार आहे. दरम्यान या आत्मचरित्राचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. पण या पुस्तकाची घोषणा मात्र झाली आहे. संजयने स्वत: ही माहिती दिली आहे.

एक असामान्य आयुष्य मी जगत आहे. जे अनेक चढ उतारांसह सुख, दु:खाने भरलेले आहे. तुम्हाला सांगण्यासारख्या अनेक रोमांचक गोष्टी माझ्याकडे आहेत. त्या गोष्टी ज्या आजपर्यंत मी कधीच जगासमोर उघड केल्या नाहीत. माझ्या कडूगोड आठवणी, माझे अनुभव, माझ्या भावना तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी उत्सुक असल्याचे संजयने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)