डेहराडून – उत्तरेकडील सहा राज्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवली जाणार आहे. त्या मोहिमेचा ब्रॅंड ऍम्बॅसेडर बनण्याची इच्छा बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याने व्यक्त केली आहे. तरूणपणी अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेला संजय त्यातून बाहेर पडला. त्यामुळे त्याने व्यक्त केलेल्या इच्छेला महत्व आहे.

संजयने अंमली पदार्थविरोधी मोहिमेचा ब्रॅंड ऍम्बॅसेडर बनण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. उत्तराखंडमध्ये गुंतवणूूक करण्याचे निमंत्रण उद्योगपतींना देण्यासाठी मी अलिकडेच मुंबईला भेट दिली. त्यावेळी माझी संजयशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या यातना स्वत: भोगल्याचे सांगत त्याने स्वत:हून मोहिमेत योगदान देण्याचा प्रस्ताव दिला, असे रावत यांनी सांगितले.

उत्तराखंडबरोबरच पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि हरियाणात संयुक्तपणे अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवली जाणार आहे. त्या मोहिमेच्या माध्यमातून अंमली पदार्थ सेवनाचे वाईट परिणाम तरूणांपर्यंत पोहचवले जाणार आहेत. त्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दर सहा महिन्यांनी बैठक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)