संजय दत्तच्या पत्नीने घेतली महेंद्रसिंग धोनीची भेट!

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा सांभाळात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिमफेरीत प्रवेश केला आहे. रोहितला पूर्व कर्णधार व सध्याच्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी वेळोवेळी मदत करत असतो. 
 
आपल्या कर्णधार पदाच्या काळात ‘कॅप्टन कुल’ म्हणून प्रसिद्ध असलेला महेंद्रासिंग धोनी ओळखला जात होता. त्याची मोठी फॅन आहे संजय दत्त यांनी पत्नी मान्यता दत्त. मान्यता दत्त यांनी दुबईमध्ये जाऊन महेंद्रसिंग धोनी याची भेट घेतली आणि त्याच्यासोबत सेल्फी घेतली. त्यानंतर मान्यता दत्त यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून ते पोस्ट देखील केली. 

पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात महेंद्रासिंग धोनीने रोहित शर्माला डीआरएमचा निर्णय घेण्याचं सांगितले होते. त्यावर विरोधी खेळाडू बाद झाला आणि धोनीची खूप प्रशंसा झाली त्याच्या अनेक क्लिपसोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)