संजय गायकवाड यांची मनसे अध्यक्षपदी निवड

मेणवली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले राज ठाकरेंचे निष्ठावान व सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांची वाईच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
वाई तालुक्‍यात संजय गायकवाड यांची वेगळी ओळख आहे.

पक्षाच्या माध्यमातून जनतेची कामे करताना समाजहितासाठी अनेक वेळा आंदोलने करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे वाईच्या मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क व मित्र परिवार असल्याने तालुक्‍यासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत केले आहे. गत पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत गायकवाड यांनी शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवली असल्याने येणाऱ्या काळात मनसेकडून त्यांची उमेदवारी इतर राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

-Ads-

यावेळी तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र सणस, वाई शहर अध्यक्ष विश्‍वास सोनवणे, उपाध्यक्ष युवराज जाधव, बावधन विभाग मयूर सणस, यशवंतनगर विभाग नारायण सणस यांची पक्षाच्यावतीने जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी निवडी जाहीर केल्या. यावेळी तालुक्‍यातील मनसेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)