संजय गांधी योजना समितीतर्फे लाभार्थ्यांना पेन्शन पत्र वाटप

रहाटणी ः येथील संजय गांधी योजना समितीच्या दोन दिवसीय शिबिरात लाभार्थी महिलेला आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पेन्शन पत्र वाटप करण्यात आले.
  • ज्येष्ठांचा सहभाग ः आमदार जगताप यांचा पुढाकार

पिंपरी, (प्रतिनिधी) – गुडी पाडव्याचा मुहूर्त साधून संजय गांधी योजना समितीच्या वतीने विधवा, अंध, अपंग, मुकबधिर, कर्णबधिर, घटस्फोटित तसेच ज्येष्ठ नागरीक अशा 323 लाभार्थ्यांना समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पेन्शन पत्र वाटप करून हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आले.

रहाटणी येथील बळीराज मंगल कार्यालय येथे दोन दिवसीय शिबिर घेण्यात आले. पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी आजवर 1100 लाभार्थ्यांनी अर्ज जमा केले होते. त्यापैकी 323 प्रकरणे पुण्यातील खडकमाळ आळी तहसील कार्यालय संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत संजय गांधी योजनेच्या तहसीलदार सुनिता असवले, सदस्य बिभीषण चौधरी, दिलीप गडदे, नरेंद्र माने, अश्विनी तापकीर, अदिती निकम, चैत्राली शिंदे यांच्या उपस्थितीत 323 प्रकरणे मंजूर करण्यात आली. उर्वरित प्रकरणांची छाननी केल्यानंतर टप्याटप्याने ते अर्ज मंजूर करण्यात येतील, असे अध्यक्ष माळेकर यांनी सांगितले.

समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर यांनी मागणी केली की, चिंचवड मतदार संघातील थेरगाव, वाकड, ताथवडे, पुनावळे गावातील नागरिकांना 40 कि.मी. पौड येथे संजय गांधी तहसील कार्यालयात जावे लागते. तरी, ती गावे चिंचवड मतदार संघाला जोडणे व आकुर्डी येथे संजय गांधी योजनेचे कार्यालय लवकर सुरु करावे. मार्गदर्शन करताना आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, शासन दरबारी पाठपुरावा करून ज्येष्ठ नागरिकांची जाण्या-येण्यासाठी होणारी गैरसोय लवकर दूर केली जाईल. आकुर्डी तहसीलमध्ये संजय गांधी योजनेचे कार्यालय लवकरच सुरु होईल. त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे.

एकूण 323 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ
संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये विधवा 155, अंध 5, अपंग 95, मुकबधिर 4, कर्णबधिर 6, घटस्फोटित 5, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक 53 या अशा 323 लाभार्थ्यांना चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप व संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर यांच्या हस्ते पेन्शन पत्र वाटप करण्यात आले. यावेळी महापालिकेतील सत्तारुड पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, बाबा त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, नरेश खुळे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)