संजय गांधी योजना लाभार्थींना मंजुरी पत्रक

वडगाव-मावळ – संजय गांधी निराधार अनुदान योजना कमिटीच्या वतीने गुरुवार दि. 17 रोजी मावळ तालुका तहसील कार्यालयामध्ये लाभार्थी मंजुरी पत्रक वाटप करण्यात आले.

मावळचे आमदार संजय भेगडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, नायब तहसीलदार सुनंदा भोसले, तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, संजय गांधी निराधार योजना नवनिर्वाचित अध्यक्ष किरण राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सातकर, कमिटी सदस्य मंगेश शेलार, वैदही रणदिवे, गोपाळ पिंगळे, रामदास आलम, मच्छिंद्रनाथ केदारी, नागेश ओवाळ,साईनाथ बाणेकर, किसनराव घरदाळे, राजमाता जिजाऊ मंचच्या संचालिका अनिता सावले यांच्या उपस्थितीत लाभार्थीना मंजुरी पत्रक तहसील कार्यालय मावळमध्ये वाटप करण्यात आले.

अध्यक्ष किरण राक्षे यांनी प्रास्ताविक केले. योजनेची माहिती व कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मार्गदर्शन केले. संजय गांधी योजनेचा लाभ तालुक्‍यातील वंचित लाभार्थींना देण्यास त्यांनी यावेळी सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर गावातील मंजूर लाभार्थी शोधून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी केले. सदस्य मंगेश शेलार यांनी सूत्रसंचालन व सदस्य मच्छिंद्र केदारी यांनी आभार मानले.

यावेळी संजय गांधी निराधार विधवांची 35, श्रावणबाळ योजनेची 11 प्रकरणांना संजय गांधी निराधार योजनेची मंजुरी देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)