संचेती रुग्णालयाच्या ट्रॉमा कोर्सला डॉक्‍टरांचा प्रतिसाद

पुणे – अपघातातील रुग्ण, ट्रॉमा केसेस यांच्या उपचाराबाबत जनजागृती, संभाषण, डॉक्‍टरांना दिसून आलेल्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर देशपातळीवरील अस्थिरोगतज्ज्ञांचे (आर्थोपेडिक सर्जन) ज्ञान अद्ययावत करण्यासाठी संचेती रुग्णालयाने आयोजित केलेल्या पुणे ट्रॉमा कोर्स ला देश-परदेशातून तज्ज्ञांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

या कोर्सचे यंदाचे 14 वे वर्ष आहे. तीन दिवसांच्या या कोर्समध्ये देशभरातील अनेक राज्यातून 325 अस्थिरोगतज्ज्ञांनी तर देश परदेशातील अध्यापन देणाऱ्या (फॅकल्टी) 40 तज्ज्ञांनी हजेरी लावली. यामध्ये जागतिक किर्तीचे ट्रॉमा सर्जन डॉ. अकिल वेरहेडेन (जर्मनी), सर्वात जास्त ट्रामा रिसर्च पेपर असणारे डॉ. रोहित भंडारी (कॅनडा) व हॅमिल्टन येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. ब्राड पीटरीसोर या तज्ज्ञांचा समावेश होता.

-Ads-

जखमा लवकरात लवकर भरण्यासाठी व हाडांची जुळनी करण्यासाठी नवीन तंत्रांचा वापर करण्याविषयी या तज्ज्ञांनी सर्व सहभागींना मार्गदर्शन केले. संचेती रुग्णालयाचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती व डॉ. पराग संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अतुल पाटील व सहकाऱ्यांनी हा कोर्स आयोजित केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)