संघ-पीएफआयवर बंदी घालणार : पिनाराई विजयन

तिरुअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया यांच्यावर बंदी घालण्यासाठी कायदा निर्माण करणार असल्याचे विधान केले. संघ आणि पीएफआय अवैधपणे लोकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा आरोप विजयन यांनी केला.

दरम्यान, विजयन यांचा हा आरोप योगगुरू बाबा रामदेव यांनी फेटाळून लावला आहे. केरळमध्ये माकप आणि संघ कार्यकर्त्यांदरम्यान विचारधारेची लढाई सुरु आहे. तेथे प्रतिदिनी हिंसक संघर्ष होत असून यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

पीएफआय आणि संघ स्वतःच्या कार्यकर्त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देते. असे प्रशिक्षण कायद्यानुसार अवैध आहे. देवाश्म मंदिरानजीक लोकांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. गरज भासल्यास या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्यासाठी कायदा आणू असे विजयन म्हणाले. धार्मिक जागा, शाळेची मैदाने आणि तसेच खासगी जमिनींवर संघाकडून प्रशिक्षण दिले जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. शस्त्रास्त्र प्रशिक्षणाबद्दल माहिती पुरविणाऱयांना संरक्षण दिले जाईल. तसेच योग्य पावले न उचलणाऱया पोलीस अधिकाऱयांवर कारवाई केली जाईल असे विजयन यांनी विधानसभेत बोलताना म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)