संघ परिवाराच्या बाहेरचा भाजपचा अध्यक्ष दाखवा

कॉंग्रेसचा मोदींवर पलटवार

नवी दिल्ली – कॉंग्रेसने नेहरू गांधी परिवाराच्या बाहेरच्या व्यक्तीला एकदा अध्यक्षपद देऊन दाखवावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना संघ परिवाराच्या बाहेरच्या किती व्यक्तींना आजपर्यंत भाजपने अध्यक्षपद दिले अशी विचारणा मोदींना केली आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषदेत मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, भाजपची स्थापना झाल्यापासून त्यांनी संघ परिवाराच्या बाहेरच्या किती व्यक्तींना पक्षाचे अध्यक्षपद दिले याची नावे सांगावीत. ते म्हणाले की, आजपर्यंत 60 व्यक्तींनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद भुषवले आहे. त्यातील केवळ 6 व्यक्ती नेहरू-गांधी परिवारातील आहेत. सन 1980 साली भाजपची स्थापना झाली. आत्तापर्यंत त्यांचे किती पक्षाध्यक्ष संघ परिवाराच्या बाहेरील आहेत असा सवाल त्यांनी भाजपला केला. ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या सध्याच्या सक्षम नेतृत्वामुळे भाजपच्या नेत्यांची झोप उडाली आहेत. राहुल गांधींची आम्ही चिंता करीत नाही असे ते म्हणतात. पण सारे केंद्रीय मंत्रिमंडळ रोज त्यांचेच नाव जपत आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात की, आता किती कॉंग्रेस शिल्लक राहिली आहे हे राहुल गांधी यांना दुर्बिण घेऊन शोधावे लागत आहे. जर कॉंग्रेसची इतकी खराब हालत झाली आहे तर त्यांना कॉंग्रेसची इतकी का भीती वाटावी की रोज कॉंग्रेसवर टीका केल्याखेरीज भाजप नेत्यांचा दिवस जात नाही, असा सवालही पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)