संघ करणार पर्यावरण जनजागृती

मंत्रालयम – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या विविध संघटनांनी पर्यावरण जनजागृती मोहीम हाती घ्यायचे ठरवले आहे. संघ परिवाराच्या वतीने अखिल भारतीय पातळीवरील समन्वय बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. तीन दिवसांच्या परिषदेचा समारोप झाला त्यावेळी माहिती देताना संघाचे सरचिटणीस मोहन वैद्य यांनी हे सांगितले.

सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही या बैठकीला उपस्थित होते. वैद्य म्हणाले की देशातील पर्यावरणाच्या ऱ्हासाने अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहेत. जलसंधारणाअभावीही अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे देशभर या विषयी जनजागृती करून उपाययोजना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

देशातील प्लॅस्टिकचा कचराही कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. पर्यावरण रक्षणाचे कार्य संघ परिवारातर्फे आधीपासूनच सुरू आहे. आता यात लोकसहभागी वाढवून ती एक जनचळवळ करण्याचा प्रयत्न संघ परिवार करणार आहे असे वैद्य म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)