संघामध्ये महिलांचे स्थान काय आहे ? – राहुल गांधी

शिलाँग : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांचे स्थान काय आहे असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. मेघालयमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळेस केलेल्या भाषणात रा.स्व. संघात नेतृत्त्वाच्या विविध पदांवर किती महिला आहेत असा प्रश्न त्यांनी आज विचारला.
मेघालयातील भाषणामध्ये राहुल गांधी यांनी भाजपा आणि संघावर टीका केली. “संघाच्या विचार प्रवाहाविरोधात आम्ही देशभर लढत आहोत. भाजपा आणि संघ देशभरात विशेषतः ईशान्य भारतामध्ये संस्कृती, भाषा आणि जिवनपद्धतीचे महत्त्व कमी करत आहेत.” ईशान्य भारतातील लोकांना उद्देशून ते म्हणाले, “आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल, भाषा आणि संस्कृतीबद्दल अभिमान असला पाहिजे. तुमच्या संस्कृती आणि विचारपद्धतीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत.” दरम्यान, आता राहुल गांधी यांच्या टीकेवर संघाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)