संघाने अण्णा हजारेंच्या हातात आंदोलनाचे शस्त्र दिले – हार्दिक पटेलचा आरोप

नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन जनतेच्या हातात जात असल्याने सरकारची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुढे केले आहे.तसेच अण्णांच्या या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फूस असून त्यांच्या हाती आंदोलनाचे शस्त्र दिले असल्याचा गंभीर आरोप पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पटेलने हा खळबळजनक आरोप केला. चांगल्या कामासाठी समर्थन दिले जाते. ते सांगून दिलं जात नाही. अण्णांच्या आंदोलनाबाबत कधी त्यांच्याशी बोलणे झाले नाही. त्यामुळे समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या पद्धतीने ते चांगलेच करत आहेत. त्यांना ‘बेस्ट ऑफ लक’, अशा शब्दांत हार्दिकने अण्णांच्या आंदोलनावर भूमिका मांडली.

तसेच ‘काल मला जी माहिती मिळाली त्यानुसार अण्णा मला मंचावर येऊ देणार नव्हते. मंचाच्या पाठीमागेच भेटणार होते. पण मुळात आमच्यासारख्या आंदोलकांना अण्णा दिल्लीवाल्यांच्या सांगण्यांवरून दूर का ठेवत आहेत? विरोधी पक्षांच्या आंदोलनातल्या सहभागावर अण्णांचा इतका आक्षेप का? मागच्या आंदोलनात विरोधी पक्ष नव्हते का? मग आताच इतकी टोकाची भूमिका का? तुम्ही जे मुद्दे उचलत आहात, त्याला विरोधी पक्षांचीही साथ असेल तर त्यांची इतकी अॅलर्जी का?, असा प्रश्नांचा भडिमारही त्याने अण्णांवर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)