संघाच्या नावाने पाकची कुभांडखोरी

योगी अदित्यनाथ यांच्या नावानेही केला थयथयाट

संयुक्तराष्ट्रे – संयुक्‍त राष्ट्राच्या महासभेमध्ये सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्दयावरून पाकिस्तानची खरडपट्टी काढल्यानंतर पाकिस्तानचे राजदूत साद वाराईच यांनी संयुक्त राष्ट्रांत राईट टू रिप्लाय या तरतूदीचा आधार घेत भारतावर भलतेच आरोप केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बदनामीचा प्रयत्न करीत कुभांडखोरी केली. पेशावर मध्ये सन 2014 मध्ये तालिबानी संघटनांनी एका शाळेवर हल्ला करून विद्यार्थी व शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली होती त्या घटनेतही भारताचाच हात होता असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान भारतानेही त्यांचे हे आरोप तातडीने फेटाळून लावले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फॅसिझमचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतो आहे. पाकिस्तानातील दहशतवादाचे मूळ हे संघाच्या फॅसिस्ट केंद्रातच आहे. धार्मिक श्रेष्ठत्वाचा दावा थेट संरक्षणाच्या माध्यमातून सर्व देशभर पसरवला जात आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये हिंदू वर्चस्वासाठीची अशांतता सर्वाधिक आहे. भारतातील ख्रिश्‍चन आणि मुस्लिम अल्पसंख्यांकांना हिंदूंकडून उघडपणे मारले जाते. आसाममध्ये कित्येक बंगालींना मनमानी पद्धतीने बेघर केले गेले असे आरोपही वाराईच यांनी यावेळी केले. उत्तरप्रदेशात मुस्लिम आणि ख्रिश्‍चनांवर होणाऱ्या हल्ल्यांचे तेथील मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्याकडून उघडपणे समर्थन केले जाते त्यामुळे तेथे मुस्लिमांच्या लिंचींगद्वारे हत्या केल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनीही सुषमा स्वराज यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भारतावर जोरदार टीका करत भलतेसलते आरोप केले. तसेच अनेक दावेही केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)