संघाच्याच नेत्याने मोदींना दिली होती विचंवाची उपमा- शशी थरुर

File photo

कॉंग्रेस नेते थरूर यांच्या विधानावर भाजपचा आक्षेप 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत असे वक्तव्य संघाच्याच सूत्रांनी केले होते असा दाखला देत कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. यावरून आता भाजपने थेट थरुर यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संघाच्याच सूत्रांनी एका पत्रकाराशी बोलताना मोदींना शिवलिंगावरील विंचवाची उपमा दिली होती. शिवलिंगावरी विचंवाला हाताने बाजुला करता येत नाही आणि तो शिवलिंगावर बसला असल्याने त्याला चप्पलनेही ठेचता येत नाही असे संघाचाच एक नेता एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत बोलला होता असे थरूर यांनी शुक्रवारी बंगळुर मध्ये आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना केले होते. थरूर यांनी या पुस्तकातील काहीं उताऱ्याचे वाचन करताना थरूर यांनी हे वक्तव्य केले होते.

थरूर यांच्या वक्तव्यावर बोलताना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले की, स्वत:ला शिवभक्त म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी थरुर यांच्या वक्तव्यावर माफी मागावी. राहुल गांधी शिवभक्त आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षातील नेते शिव लिंगाची पवित्रता आणि महादेवाचा अपमान करतात असे प्रसाद म्हणाले. थरुर यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जर 2019मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आले तर भारत हिंदू पाकिस्तान होईल, असे थरुर म्हणाले होते.

चौकट
सहा वर्षापुर्वीचे संघ नेत्याचे वक्तव्य – थरूर
दरम्यान भाजपने या प्रकरणात त्यांच्यावर टीका केल्यानंतर त्याविषयी बोलताना थरूर यांनी म्हटले आहे की मोदींना विचंवाची उपमा देणारे वक्तव्य माझे नाही. तर संघाच्याच एका नेत्याने सहा वर्षापुर्वी केलेले हे वक्तव्य आहे आणि ते देशातील लोकांना माहिती आहे. त्या विषयावरून भाजपने उगाच कुभांड रचण्यास सुरूवात केली असून त्यांच्याकडे या खेरीज करण्यासारखे आता काहीही उरलेले नसल्याने त्यांनी असले उद्योग सुरू केले असावेत असे थरूर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)