संघाचा विजय अधिक महत्वाचा – शिखर धवन

सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला वेगवान सुरुवात करुन देताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या शिखर धवनला मालिकेतील कामगिरीच्या बळावर मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी बोलताना शिखर म्हणाला की, चांगला खेळ करणे हे नेहमीच आनंददायक असते. मात्र, तुम्ही चांगला खेळ केल्यानंतर संघ विजयी होणे हे अधिक महत्वाचे असते.

यावेळी पुढे बोलताना धवन म्हणाला की, फलंदाज म्हणुन तुम्ही धावा करत असला तर ते तुमच्यासाठी नेहमीच सुखद असते. तसेच महत्त्वाच्या सामन्यात तुम्ही चांगली कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला तर त्याचा आनंदही जास्त असतो. मात्र, माझ्या साठी त्याही पेक्षा जास्त संघाचे जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे. असेही त्याने यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)