संघाकडून राम मंदिरासाठी मोर्चेबांधणी 

नागपूरात 25 नोव्हेंबरला “हुंकार रॅली’चे आयोजन 

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिर उभारण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिल्या असून यासाठी मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. कायदा करा किंवा अध्यादेश काढा, पण मंदिराचे निर्माण सुरु करा, असे म्हणत नागपुरात पहिली हुंकार रॅली 25 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी अयोध्या आणि बंगळुरु येथे ही दोन अजून हुंकार सभा होणार आहेत.

नागपूर येथील संघ मुख्यालयात शनिवारी सकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीस नागपूरमधील भाजपचे नगरसेवक, आमदार आणि संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

25 नोव्हेंबरला नागपूरमध्ये आंदोलनासंदर्भात पहिला मेळावा म्हणजेच हुंकार रॅली होणार असून या रॅलीसाठी लाखो लोक येतील, असा अंदाज आहे. साध्वी ऋतंभरा आणि अन्य मंडळी 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या हुंकार रॅलीतील प्रमुख वक्ते असतील, असेही समजते.

उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात 25 नोव्हेंबर रोजीच एकत्र अभियान सुरु केले जाईल. पुढची रॅली थेट दिल्लीत आयोजित केली जाणार आहे. ऋतुंबरा आणि 4 शंकराचार्य ही उपस्थित राहतील. या हुंकार सभेत मागणी एकच केली जाणार आहे, की केंद्र शासनाने कोर्टाची वाट न पाहता अध्यादेश काढून किंवा कायदा करुन मंदिर निर्माण सुरू करावे. ही मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदा विजयादशमीच्या कार्यक्रमात मांडली होती. मात्र, त्यानंतर ज्या झपाट्याने संघ परिवार कामाला लागला आहे. यावरुन एक संपूर्ण ब्लू प्रिंट तयार केल्यावरच भागवत हे बोलले हे स्पष्ट आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)