संघर्ष मित्र मंडळाला प्रथम क्रमांक ; जिल्हा पोलीस दलातर्फे बक्षीस वितरण 

तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते स्वीकारताना मंडळाचे पदाधिकारी
जामखेड: अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सन २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत कर्जत विभागात तालुकास्तरीय स्पर्धेत जामखेड येथील संघर्ष मित्र मंडळाने प्रथम क्रमांक, आदेश प्रतिष्ठाने द्वितीय क्रमांक तर शंभूराजे मित्र मंडळाने तृतिय पटकाविला आहे  पालकमंत्री ना राम शिंदे यांच्या हस्ते  बक्षीस देऊन मंडळांना गौरविण्यात आले.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सन २०१७ मध्ये जिल्हातील  गणेशत्सव मंडळांनी चांगले देखावे ,पारंपरिक वाद्य तसेच उत्कृष्ट विसर्जन मिरवणूक केलेल्या मंडळांना पोलीस ठाणे ,उपविभाग व जिल्हा निहाय बक्षीस वितरण कार्यक्रम नगर येथील पोलीस मुख्यालय आयोजित करण्यात आला होता यावेळी राज्याचे जलसंधारण तथा पालकमंत्री ना राम शिंदे ,खासदार दिलीप गांधी , जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी ,जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ,जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर सुरेखाताई कदम,आदींसह जिल्हातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कर्जत विभागाकडून श्रीगोंदा ,कर्जत ,जामखेड येथील मंडळाचा समावेश होता यावेळी जामखेड येथील कोर्ट रोड येथील कोर्ट रोड वरील संघर्ष मित्र मंडळाने अतिशय शांततेत गणेशत्सव साजरा करून वायफाट खर्चाला फाटा देऊन सध्या पारंपारिक पध्द्तीने साजरा केल्याबद्दल कर्जत विभागात तालुकास्तरीय स्पर्धेत जामखेड येथील संघर्ष मित्र मंडळाने प्रथम ,आदेश प्रतिष्ठाने द्वितीय क्रमांक तर शंभूराजे मित्र मंडळाने तृतिय पटकाविला आहे यासह  सर्व मंडळांचा बक्षीस वितरण पालकमंत्री ना राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम क्रमांक मिळविलेले संघर्ष मित्र मंडळ हे सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक.मंडळाची स्थापना सन 19८५  साली झाली असून मंडळाची गणेशमूर्ती भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. प्रारंभीच्या काळापासूनच प्रबोधनाचा वारसा मंडळाने जोपासला आहे. गेली काही वर्षें गणेशोत्सवामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपला ठसा उमटवित आले आहे. या वर्षी मंडळाने सर्व खर्चाला फाटा देत तळ मृदुगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामामाजिक उपक्रम राबविले जातात. गेल्या वर्षी मंडळाने धर्मादाय कार्यालयात श्री प्रतिष्ठान नावाने मंडळाची नोंदणी हि केली आहे  मंडळाने सादर केलेला विघुतरोषणाई हे शहरवासियांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. याशिवाय वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचे संतुलन, व्यसनमुक्ती, बेटी बचाव,गुलाल मुक्त प्रमुख्याने आधुनिक वाद्याचा वापर टाळुन, डीजे मुक्त यासह विविध उपक्रमांनी मंडळ वर्षभर समाज उपयोगी कार्यक्रम घेत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
30 :thumbsup:
16 :heart:
0 :joy:
10 :heart_eyes:
3 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)