संघर्षामुळे जगातील 12 कोटी 40 लाख भुकेलेल्यांना अन्न मिळणे दुरापास्त

तितक्‍या लोकांचे भूकेने बळी जाण्याची स्थिती
संयुक्तराष्ट्रे – जगातील 12 कोटी 40 लाख लोकसंख्या असलेल्या भागातील लोकांना तेथे सुरू असलेल्या संघर्षामुळे अन्न पुरवणे जिकरीचे बनले असून हे लोक आता त्यामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे आहेत असा गंभीर इशारा संयुक्तराष्ट्रांच्या फूड एजन्सीने दिला आहे.

या एजन्सीचे डेव्हीड बीस्ले यांनी सांगितले की सोमालिया, येमेन, दक्षिण सुदान आणि ईशान्य नायजेरीया या चार देशातील सुमारे 3 कोटी 20 लाख लोकांना रोजचे अन्न मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यांना अन्न पुरवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत पण तेथे सुरू असलेल्या संघर्षामुळे त्यांच्या पर्यंत अन्न पुरवणे जिकीरीचे बनले आहे त्यामुळे हे लोक आज भूकेने मृत्यूच्या दारात उभे आहेत.

अन्न आणि संघर्ष यांच्यातील संघर्ष विनाशाच्या उंबरठ्यावर आहे असे त्यांनी म्हटले आहे. संघर्षाच्या स्थितीमुळे अन्नाची असुरक्षितता निर्माण होते आणि या अन्न असुरक्षिततेमुळे पुहा संघर्ष उद्‌भवतो अशा विचीत्र स्थितीत हे देश सापडले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. आज जगातील ज्या 81 कोटी 40 लाख लोकांपुढे अन्नाची समस्या आहे. त्यापैकी 60 टक्के लोक असे आहेत की त्यांना यापुढचे जेवण आपल्याला कोठून मिळणार आहे याची समस्या आहे. आणि हे सगळे लोक ज्या भागात संघर्ष सुरू आहे त्या भागातील रहिवासी आहेत.

जगातील अन्न उत्पादन वाढले आहे अनेक ठिकाणी दारिद्य्राचेही मोठ्या प्रमाणावर निमुर्लन होत आहे. त्यामुळे त्यांची खरेदीची शक्तीही वाढली आहे पण जगातील ज्या भागात मोठ्या प्रमाणावर धार्मिक, वांशिक अथवा सामाजिक विद्वेषातू संघर्षाची स्थिती उद्‌भवली आहे त्या देशातील लोकांपुढे मोठ्या प्रमाणात अन्नाची असुरक्षितता निर्माण झाली असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)