संघटीतपणे भाजपला हटवणे हाच राहुल गांधी यांचा संदेश – सलमान खुर्शिद 

नवी दिल्ली: विरोधी पक्षांनी एकत्रीत येऊन संघटीतपणे प्रथम भाजपला सत्तेवरून हटवले पाहिजे हाच राहुल गांधी यांचा संदेश आहे. त्यामुळेच पंतप्रधानपदाच्या वादात विरोधी पक्षांना अडकवण्याच्या भाजपच्या सापळ्यातून बाहेर पडणे त्यांनी पंसत केले असून त्यांचा हाच संदेश महत्वाचा आहे असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस अध्यक्षांकडून धोरणात्मक दृष्ट्या झालेली ही सर्वात चांगलीखेळी आहे असेही त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले आहे.
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी होणार असेल तर त्या आघाडीतून कॉंग्रेसला दूर ठेवणे चुकीचे ठरले आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थतीचा केवळ भाजपलाच लाभ होऊ शकतो त्यामुळे त्यांना कॉंग्रेसला दूर ठेवता येणार नाही असे ते म्हणाले. खुर्शिद हे दोन वेळा उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते म्हणाले की कॉंग्रेसला दूर सारणे हे अदूरदृष्टीचे ठरणार आहे. सन 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने येथे चांगली कामगीरी केली होती हे विसरता येणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
कॉंग्रेसच्या मतांविषयी बोलताना ते म्हणाले की आम्ही जेव्हा अत्यंत खराब स्थितीत होतो तेव्हाही आम्हाला उत्तरप्रदेशात सात टक्के मते मिळाली होती आणि आताही जर आम्ही स्वबळावर लढलो तर आम्हाला 12 टक्‍क्‍यांपर्यंत मते मिळू शकतात. सपा बसपा आघाडीला 24 ते 26 टक्के मते मिळू शकतात पण आमची बारा टक्के मते त्यांना महत्वाची वाटत नसतील तर त्याचे त्यांनाच नुकसान सोसावे लागले आणि पर्यायाने भाजपला यात लाभ होंऊ शकतो. त्यामुळे कॉंग्रेसला उत्तरप्रदेशात सहजासहजी मोडीत काढता येणार नाहीं. कोणत्याही निवडणुकीत दहा टक्के मते हा महत्वाचा फॅक्‍टर ठरू शकतो असेही त्यांनी नमूद केले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)