संग्रामनगर विकासासाठी सोळा लाखांची मंजुरी

अकलुज-शासनाच्या विविध योजनांचा संग्रामनगर गावासाठी सुमारे सोळा लाखाची कामे मंजूर झाली असून, जनतेने त्याचा लाभ घ्यावा, असे मत माजी उपसरपंच आणि श्रीराज युंवा मंचचे अध्यक्ष श्रीराज माने पाटील यांनी संग्रामनगर येथे विविध विकामकामांच्या भूमिपूजन वेळी व्यक्त केले.
संग्रामनगर ग्रामपंचायत संग्रामनगर अकलुज (ता. माळशिरस) यांच्या वतीने विविध विकासकामाचे भूमिपूजन झाले. यावेळी अध्यक्ष श्रीराज नंदुकुमार माने पाटील आणि सरपंच राजवर्धनीदेवी माने पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. दलितवस्ती सुधार योजना आणि 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 2017-18 नुसार नायकुडे वस्ती येथे कॉंक्रिट बंदिस्त गटार बांधकामासाठी पाच लाख रुपये, तसेच कणसेवस्ती कॉंक्रिट गटार आणि रस्ता 6 लाख, तसेच कणसे वस्ती येथे पाणी पुरवठा पाइपलाइन कामासाठी 1 लाख, हिरवे कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण 3 लाख, शिवनेरी तालीमजवळील रस्ता 3 लाख असे एकूण 16 लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. यावेळी माजी सरपंच शंकरराव बामणे, सदस्य दत्तात्रय आसबे, राजू आगवणे, जावेद शेख, सुलभा बामणे, ग्रामविकास आधिकारी सुधाकर मुंगूसकर, सलीम तांबोळी आणि ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)