संग्रामनगरला अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही

अकलूज- अकलूज शहरामधून संग्रामनगर हे शहर विभक्त होऊन 25 वर्षे झाली; परंतु अद्यापही या गावाला स्मशानभूमी नाही, त्यामुळे जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक नेतेमंडळी जाणुनबुजून डोळेझाक करीत असल्याने नागरिकांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने प्रांतअधिकारी, अकलूज यांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, तसेच स्मशानभूमी बांधून द्यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.
संग्रामनगर गावची स्थापना 1993 मध्ये झाली असून, गाव तिथे स्मशानभूमी असे शासनाचे धोरण असतानासुद्धा या गावाला अद्याप स्मशानभूमी नाही. मयत झाल्यास नागरिकांना अकलूज येथे पायपीट करून अंत्यसंस्कार करण्यासाठी
जावे लागते आणि आर्थिक बोजा सहन करावा लागतो. दुःखात देखील मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या गोष्टीची दखल घेऊन योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने प्रांतअधिकारी, अकलूज यांना स्मशानभूमीसाठी जागा आणि स्मशानभूमी बांधून द्यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.
ही मागणी मान्य न झाल्यास निवेदनात आंदोलनाचा इशारा दिला आहे, यापुढे गावात कोणाची मयत झाल्यास प्रांत कार्यालय, अकलूज येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर खिलारे, जिल्हा प्रमुख सचिन कुपाडे, तालुका प्रमुख गणेश भिताडे, बिपीन बोरावक, दत्ता साळुंखे, विराट आहेर, अकलुज शहर प्रमुख ओंकार मोरे, तेजस उबाळे, हरीश वाघ उपस्थित होते. हे निवेदन प्रांत अधिकारी यांच्या वतीने हणमा जाधव यांनी स्वीकारले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)