संगीत हे मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम!

– चंद्रकांत महाराज वांजळे : थेरगावात संगीत विद्यालयाचे उद्‌घाटन

पिंपरी – संगीत श्रवण केल्याने मनाला प्रसन्नता लाभते. माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे संगीत हे महत्त्वाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक चंद्रकांत महाराज वांजळे यांनी केले.

-Ads-

थेरगाव येथील ऋतुका संगीत विद्यालयाचे उद्‌घाटन चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा बॅंकेचे अध्यक्ष कांतिलाल गुजर होते. वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम गुजर, हभप ज्ञानेश्वर गुजर, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर मांडेकर, महावीर सूर्यवंशी, किसन चौधरी, नितिन काकडे, अरुण येवले, सुखदेव बुचडे, रावसाहेब परकाळे, रामलिंग मोहिते, गणेश गुजर, नाना शिवले, बॅंकेचे संचालक श्रीधर वाल्हेकर, सुरेश पारखी, अंकुश पऱ्हाड, संतोष मुंगसे, सुजाता पारखी, नंदकिशोर तोष्णीवाल, राजेंद्र शिरसाट, प्रेरणा शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी विलास दसाडे, यशवंत पवार आदी उपस्थित होते.

वांजळे महाराज म्हणाले की, विकारातून संस्काराकडे आणि संस्कारातून प्रबोधनाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे वारकरी संगीत होय, नृत्य, गीत आणि वाद्य या तिन्हींचे मिळून संगीत बनते. सं म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत आणि त म्हणजे ताल. स्वर, गीत व ताल यांचा सुरेख संगम म्हणजे संगीत होय. सा, रे, ग, म, प, ध, नि, सा या सात सुरांतून राग आकाराला येतात. ताल हे लयीवर आधारित असतात. संगीताची साधना ही स्वरांची साधना आहे, कारण स्वर हे त्याचं खरं माध्यम आहे. स्वर साध्य केल्याशिवाय स्वरांचं ज्ञान होऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

नाना शिवले यांनी स्वागत केले. उमेश आगम यांनी प्रास्ताविक केले. गौतम दळवी यांनी सूत्रसंचालन केले. अनिल नाईकरे यांनी आभार मानले. वारकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष कालिदास गुजर, संभाजी शेलार, वंदना पऱ्हाड, पांडुरंग दिवटे, अनिल नाईकरे, यशवंत बोधे, आशा वेठेकर यांनी संयोजन केले. सीए भूषण तोष्णीवाल यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)