संगीत नाट्य महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन

पुणे – बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे आयोजित केलेल्या संगीत नाट्य महोत्सवाचे उद्‌घाटन बुलडाणा अर्बन को. ऑप. सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्या हस्ते बुधवारी झाले.

देशपांडे म्हणाले, संगीत नाटक हा भारतीय संस्कृतीचा दुर्मीळ ठेवा असून समाजातील तो जपण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न केले पाहिजे. या महोत्सवाला आमच्यातर्फे कायमस्वरुपी सहकार्य करण्यात येइृल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी संगीत नाटकांना “दुर्मीळ सांस्कृतिक ठेवा’ असा दर्जा युनेस्कोने बहाल करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले.

उद्‌घाटनानंतर गोविंद बल्लाळ देवलिखित “संशय कल्लोळ’ हे संगीत नाटक रत्नागिरीच्या “खल्वायन’ या संस्थेच्या कलाकारांनी सादर केले. सूत्रसंचालन अनुराधा राजहंस यांनी केले. अवंती बायस यांनी आभार मानले. बालगंधर्व रंगमंदिर येथे संगीत नाट्य महोत्सव रसिकांसाठी 2 नोव्हेंबरपर्यंत खुला राहिल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)