संगीत नाट्य महोत्सवाचा समारोप

पुणे – बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन केले होते. या तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप शुक्रवारी “संगीत कान्होपात्रा’ या नाटकाने झाला. बालगंधर्वांनी अजरामर केलेले ना. वि. कुलकर्णी लिखित भक्ती रसप्रधान असलेले “कान्होपात्रा’ या नाटकाचे सादरीकरण सुरेश साखवळकर, अस्मिता चिंचोळकर, अवंती बायस यांच्यासह बालगंधर्व संगीत रसीक मंडळाच्या कलाकारांनी केले. या संगीत नाट्य महोत्सवास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

याआधी रत्नागिरी येथील खल्वायन या संस्थेतर्फे गोविंद बल्लाळ देवल लिखित “संशय कल्लोळ’ या सर्वोत्कृष्ट विनोदी मराठी संगीत नाटकाचा आणि पुणे येथील “कलाव्दयी’ संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या संगीत रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले “मानापमान’ अशा दोन नाटकांचा रसिकांनी आस्वाद घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)